भाताची आवणी करीत आस्ताना ह्या गाणा म्हन्लाय एका आजीना. गाव-वरची खडकी. मराठी भाशीमंधी पावसाची गाणीच नैत. थ्वोडीफार आसतील तं त्या लोकगीता आथा संपायाच लागल्यात. ह्या आजीना जशा मोकळ्या गळ्याना मनापसून ह्या गाणा म्हणलाय तसा कोण्ही गायक स्टुडीवमंधी गाऊ शकत नय. ह्या आसा गाना तवाच गळ्यातून निघाताय जवा पाय चिखलपाण्यात भिजेल आसतील अन आंगावं पावसाच्या धारांनी भिजून बारीकसा काटा येयेल आसंल. म्हणून ह्या खरा खुरा मातीतला, मातीशी जोडेल अन आभाळातल्या पावसासंगा नाता जोडणारा गाणा हाये.
मऱ्हाटीची येक लय मधाळ बोली हाये, तिला डांगाणी/मावळी भाशा म्हंत्यात. पण ही भाशा निऱ्ही तोंडी सोरुपातच हाये, ती आजवर कोन्हा लिव्हली नय. ही भीमाशंकर ते त्र्यंबकेश्वर ह्या पट्ट्यात बोलली जातेय. ही भाशा लय ग्वाड हाये. दुसऱ्या मराठीच्या बोलींसारखंच सब्द हायेत पण उच्चार लय येगळं हायेत, त्या उच्चारामुळं भाषा लय ग्वाड वाटतेय. म्हणी तं इतक्या हायात का इचारता सोय नय. गाणी, भारूड, भजना ही सगळी तं ह्या बोलीत कितीतरी हायात, पण ह्या समदा तोंडी हाये. तिचा ह्यो मोठा वारसा कुढंतरी जपून ठिवावा म्हणून हा एक परेत्न
No comments:
Post a Comment