आदिवासी साहित्य म्हणला की लोकांना निस्ती गरिबी दिस्ते... भिलाऊ भाशा पुस्कतात येईल आसा क्वानाला कव्हा वाटला बी नसंल, पर सुनिल गायकवाड ह्येंनी आपल्या पेनाचा वईच वापर करून आदिवासी संवेदना, संस्कृती यावर लिव्हला आणि त्येची जगानं दखल घ्येतली. त्यांच्या ईशयी क्वानाला जर अजुक माहीत करून घ्येयाचा आसल तर तुम्ही खालील लिंकावं क्लिक करून ब्लॉगाला भेट द्या....
मऱ्हाटीची येक लय मधाळ बोली हाये, तिला डांगाणी/मावळी भाशा म्हंत्यात. पण ही भाशा निऱ्ही तोंडी सोरुपातच हाये, ती आजवर कोन्हा लिव्हली नय. ही भीमाशंकर ते त्र्यंबकेश्वर ह्या पट्ट्यात बोलली जातेय. ही भाशा लय ग्वाड हाये. दुसऱ्या मराठीच्या बोलींसारखंच सब्द हायेत पण उच्चार लय येगळं हायेत, त्या उच्चारामुळं भाषा लय ग्वाड वाटतेय. म्हणी तं इतक्या हायात का इचारता सोय नय. गाणी, भारूड, भजना ही सगळी तं ह्या बोलीत कितीतरी हायात, पण ह्या समदा तोंडी हाये. तिचा ह्यो मोठा वारसा कुढंतरी जपून ठिवावा म्हणून हा एक परेत्न