.
पस्तीस चाळीस वर्षे झाली आथा...कंचा बी व्हता आन कन्चा नय माहीत नय ब्वा पर याक-याक वांगा तानतवली यव्हाढला रयाचा...आन त्याच म्व्हाटाली वांगी पहून ल्वाका महालदेसात प्वोरी दियेची...सोयरे समंद ज्वाडायची...महालदेस म्हजी पयलेपसून धरणांचा तालूका...पाण्याला त्वाटाच नय...धरणाचा पाणी खाली झाला म्हजी गाळप्यारा उघडा पडायचा चवळी, मुग, उडीद, मठ, हारबारं, करडंई, सुर्यफूल, वाळका, कलिंगडा, ढ्वोबळ्या मिरच्या आणि सम्द्यात स्वापा पिक म्हजी वांगी...म्वाकार तरवाट महालदेसे ल्वोक... बागाईतदार...सम्देंच्या निसत्या वाकड्याच ट्वोप्या...भगली बारा न् खिशात गारा...निरा सांगायचा भुषान...नय त् कयाचा काय...उघड्याला वा खात्यात आन पांघूरणाली झ्वोमबंत्यात तसी गत आसं महालदेसेंचि...लगीन कार्य आसला का लय आमचा थाट रयाचा...वरमाय त् निस्ती टाचावं आन् चवडेवं हिंडायची...आसेच लग्नाच्या काही गमती...
गावात यखांद्याचा काज आसला का आमी प्वारा लग्नाला जायाचो...चार मंगल व्होवोस्तवर बामणाचे ड्वोक्यात तांदूळ मारुन बामणाला पिसाळावायचो...तिढं यखांद पुढायदार उभा आसला त् त्या म्वाकार आमचेवं कातावून धावायचा...पर आमचा ट्वाळका लय आतरंग्या आसं...कुयकूनय दडून का व्हयना पर तांदूळ फेकून हानायचोच...झाला मंग पाचवा मंगल सुरु झाला का आमी हाळापसी जाऊन उभा रयाचो...पर आमी मातर जेस्ती भाजीच वाढाया रयाचो...भाजी म्हजी निऱ्या वांगेच्या म्वोठम्वाठाल्या खापा...आन तेच्यात कुडंमूडं इराळगत बटाटेच्या फ्वोडी रयेच्या...मंग आमी त्या चाळून-चाळून बटाटेच्या फ्वोडी मांगा उरवीत चालायचो...आन वऱ्हाडाला निरी वांगीच खाया घालायचो... वऱ्हाड हाये मंग ते वांगेचे भाजीत बटाटेची फ्वोड गवसीताय...पर कयेची फ्वोड गवसंते...गेली त् गेली कुडं इराळगत यखांद आरध्याला...नयतं निस्ती वांगीच...यगदा पयली पंगत पार पडली,... का दुसरी पंगत आमचीच पठ्ठेंची रयेची...आमची प्वारांची ट्वोळीचे टोळी यकेच लायनीत जेवाया बसून घियेची...आन आमच्यातला यकजन जागेवं पत्रंवळ ठिवून भाजी वाढाया रयाचा...मंग त्या दडून ठियेल बटाटेच्या फ्वोडींची यक बादली भरुन वाढ्या आमचे पंगतीला त्या इयाचा...आन चांगल्या ध्वापा भरुन आमाली वाढायचा...लय मज्ज्या दादावो तवाची...
आन आथा तेच ज्वोडीदार कंदी भेटलं त्... आन तेली बटाटेचे फ्वोडीची ग्वोट काढली त् क्वान म्हंता नको-नको मुळयाद... क्वान म्हंता नको डायबीटीस... साकर... क्वान म्हंता वात उठाताय... क्वानला भुळकांडी लागंती... त् आसी वली माती आन हाजार गती...आथा बटाटा पहून लांब-लांब पळंत्यात वयेंडी...😂😂
लेखन...
आदि-जगन सिताराम खोकले
रा.सोमज ता.इगतपूरी जि.नाशिक
मो.९७ ६५ ४५ ७३ ६२