सन्माननीय वाचक

Thursday, August 2, 2018

हाक गावाची

उंच डोंगरावरूनी, चांदाचा झुलतो झुला
आन चांदण्या जणूका, रानी पांगवली फुला

दूर हींडतो मज्याना, वारा म्वाकळं पाखरू
कोण थोपयील त्याला, आभाळच समदा खुला

आंगणात सांडयीते, रोजीला पिवळा सडा
पेटवून क्वोन ग्येला, आभाळी त्या ईस्तुला

बैल नांगरा वढीती, गायी पानवल्या घरी
रानमाळ तूडयीती, गूरांमांगं उभी मुला

आज पावसात काही, ग्येली भीजत ल्येकरा
कोण बोहयीत व्हता, वाढूळा त्या बाजुला

लांब चालली नदी, त्यीला जावून जरा म्हणा
त्वा मह्यार सोडला, म्वाठा सासार मिळो तुला

रोज गावच्या रस्त्याला, लायीती नजरा सदा
बा खतावला किती, आयीच्या बांध न आसुला

देवळात देव नाही, तू बी हारवला कुढं
यी फिरून रं घराला, सांगा 'आनंद' भाऊला





चांदाचा-चंद्राचा
ईस्तुला-विस्तवाला
बोहयीत- बोलवित
वाढुळा- बऱ्याच वेळेपासून
मह्यार-माहेर
खतावला-आठवणीने व्याकुळ झाला
आसुला-आसवांना



15 comments:

  1. ड़ांगाणातले गुलजार..👌👌👌

    ReplyDelete
  2. छान ....
    भाषा संरक्षण व संवर्धनाचा उत्तम प्रयत्न....
    ...
    मी २०१७ मध्ये ५ बोलींचा ' स्वच्छंदी भरारी ' हा
    ई- दिवाळी अंक संपादित केला होता...
    २०१८ मध्ये त्यात अजून महाराष्ट्रातील इतर बोलीं चा अंक प्रकाशित करणार आहे.. त्यावेळी आपल्या बोलीचं साहित्य त्या अंकात घेईन...
    भाषा संरक्षण व संवर्धनाच्या आपल्या प्रयत्नास हार्दिक शुभेच्छा......

    ReplyDelete
    Replies
    1. खूप आभार सर
      भाषा संवर्धनाच्या प्रयत्नांना तुमचे प्रोत्साहन खूप बळ देणारे आहे.
      आमच्या ब्लॉगवरचे साहीत्य आपण आपल्या दिवाळी अंकात पुनःप्रकाशित करणार आहात ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.

      Delete
    2. धन्यवाद सर..
      आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी नवप्रेरणा आहे ..
      आमच्या ब्लॉग कडून आपले मनपूर्वक धन्यवाद ...

      Delete
  3. समदेंचं लय आभार

    ReplyDelete
  4. खरचं लै भारी

    ReplyDelete