सन्माननीय वाचक

Tuesday, July 31, 2018

सागोतीचं ठाव

तिसऱ्या पहारी पडलो होतो चीचखाली घोंगडी टाकून पक्या माश्या तोंडाव घोंगघोनं करीत.. तरी पण तसाच पडून व्हतो. गार वारा सुटला तसा मार्त्यादाचा पक्या येऊन बिलागला.. आसा दिला कनाय तडाका ठिऊन, एक त झॉप मॉड केली. तसा वैनींना आवाज दिला ब्वा.. दाजीबा किती झॉपाता कायनू त्या तिकडं चोहंडीक ह्यारा किती लॉका जमल्यात ह्यारा.. डोळं चोळीतच उठून बटवा चापसाया लागलो त बंडीच्या खिशातय ह्या माया ध्यानात आला. इकडं तिकडं ह्यारला त पक्या मेहडीपशी फुसफूस करीत व्हता. त्याला हाक मारली... पका...तमाकू आन र बा मायीं तेवडी... तेवड्यात डाफारलाच पॉर.. मंगाशी मला माराया तवा कसा.. मी नय जा.. आर आन बाळा तुला न्हेतो ना चोहंडीक बाव आणाया. तवा कुड आणली त्याना तमाकू.. वैणीला काय म्हणायचाय ह्या माह्या ध्यानात आलाच व्हता. बटया बरबर पितळी आन कोयतायबी दिला व्हता तिना पक्याक.. तमाकू चोळीतच उठलो न चालाय लागलो त पॉर मागच पितळी वाजीत चालल्याला.. गेलेव समदी तयारी. बकरू कापला त कॉण सागळ काढाया त कॉण देड धिवाया, वाघ्याबा रक्ती शिजवाया, तासाभऱ्यात उराकला. भोऱ्यादाना येतानाच खराळाकून सागाची पाना आणलेली. खांडखुंड झालेव पाना आथारली.. नानांनी सांगितला पोराणली रक्ती द्या, तवर कारभारी येतील ते आलेव करतील ठाव... कारभारी आलं, तवर रक्ती खाऊन झाली व्हती. मंग वाटी वाटी भरून सागाच्या पानाव ठाव केलं. हाडका, मवशी, वजडी, काळजाच बारखानल तुकडं, प्रत्येकाना आपापला ठाव उच्याल्ला पितळीत ठिवला न झावळा पडस्तवर घरी गेलं गडी ठाव घेऊन.. आन पितळ्या भानवशिव ठिवल्या तिथून पूड मंग कांजी आन मंग ज्यावना...
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🙏
गणपत रामचंद्र कोंढवळे, कळंबई



4 comments:

  1. आम्हाकं वाटा घाला म्हणत्यात ठाव करायाला. बकरू घेतलाय, वाटा पैजे का आसा इचारीत्यात.

    ReplyDelete
  2. मंग त्या दिसी चुलीच्या डाहारात दाॅन तिन कांद भुजाया टाकीत्यात.अन मंग पक्का भारी मशाला पाटेव वाटीत्यात.मंग त्या दिसी तॅल जरूसा जास्तस वतिते आता.

    ReplyDelete