सन्माननीय वाचक

Wednesday, July 25, 2018

गळ

तसा गळांच बरचलय परकारयत पर मंग आपल्याक डांगाणात तिनच परकारच गळ वापरीत्यात म्हणून म्या मह्या आठवणीची गोठ सांगतोय.
       गळान मास धरायची पकी जूनीच कला हाय.
मला आठवाताय तसा आमच्याक त सगळी लाॅका ज्याम गळाव जात्यात. मोक्कार मास धरीत्यात बरका.
तसाच एकदा  मी बारीकच होतु सकाळची नेहरी झालेव मी चूल्हीमोहर शेकत बसलू व्हतु तेवढ्यत मह्या मोठ्या भावाना खळ्याक जाऊन हाक मारली आन् सांगातत्ला सित्या  टिकाव नथ कुडावना आनर मी झापाच्या बहेर निघालू आन् दारातल्या सपरीला टिकाव, कुडावना, व्हाता पर मंग म्या त्या नैय नेला कुदळीच नेली. इच्चरला कयाला लागतीय र त भाऊ?
म्हण गांडुळ खनाया आन् ते गांडुळ कयाला?
त म्हण गळाला लावाया.
आन् म्या परत इच्चारला गळ म्हंजे?
आर मासेली गळ लावयचा आन् ते मास गांडुळ खाया म्हणून येतत आन् गळच तेंच्या तोंडाला रूतुन जातोय आन् मासा पका तरफडोतोय मंग आपुन गळ ऊडऊन घ्याचा तो मासा पीसइत ठुवायचा तसाच करून करून पक मास धरायच आन् संद्याकाळी आय मास्यांचा कोरड्यास करील आपलेली खाया...
तीतक्यात मला भाव म्हण्ला पळत पळत व्होय र दात मंजनीचा रीकामा डबा आन.
मी पळत पळत घरी गुलू डबा आनुन दिल्हा मंग ते सगळ गांडुळ त्या डब्यात भरून, द्वान ऊडाव गळ घेऊन नदिक गोलो आम्ही दोघ भाव.
गळाला गांडुळ लाऊन टाकला. लगेच बाळोखी  लागली मह्या गळाला आन् ऊडावला गळ घेतली काढुण परत लावला आसायकरू एेक्याच जाग्याव मला सात मास लागल तवा पसुन भाऊ मला सारखच घेऊन जायाचा एका दिसी काय झाला मी एकटाच मासेली गेलू  व्हतू नदिचा पुर ओसारला व्हाता आन् गढुळीही कमीच व्हती म्या लावला गळ मासाच लवकर लागना मीइच्चारातच पडलू काय झाला बुव्वा?樂
मंग वजच गळ काढला हेरीतोत काय गांडोळा सगट खेकड घेऊन गेली मह्यावाला गळ. म्हन्ला आता परत घरी गेल्याव काॅलदांडाच...
पार हिंगमोड होऊन निघलू परत झापाक (घरी) चलता चलता वावराच्या मेंडाक ध्यान गॅला त पकीना आळींम व्हाती मंग ज्याम आळींम नेली घरी आयना मासेली वाटेल मिर्चीमसाला आळम्बीच्याच कालवाणात घातला व्हता. मास्याच्या आन् सागोतीच्या कालवाणा सरखाच लागला रातच्यायळी मह्या "बा" ना इच्चारला कायर शिकारी आज आळीमीची शिकार केली.? मंग म्या "बा" ला सांगात्ला मह्यावाला गळ खेकडीना खुडुन नेला ना .
तव्हा मव्हा "बा" सांगाया लाग्ला आर गाडीस्या आता उडाव गळाला मास नैय लाग्नार ह्या दिवसात खुटगळ लावाया लागतत.
त्यांचाय शिजन रह्याताय उडावगळ (छडी) , खुटगळ, चमक्यागळ आस तेन्च परकार रहेतत.
मंग म्या तीन्ही शिजनाच मास धर्ल त्याच सालापसुन मास धराया शिकलो...
मी. आर्जूना बांड्याचा सित्या



7 comments:

  1. गांडूळ नै मिळालं का गव्हाचा पीठ लावीत्यात कवाकवा. काहिजना त बारख्या बेरकडीचं पेंधय लावीत्यात गळाला खाद्य म्हणून

    ReplyDelete
    Replies
    1. पिकेल आळवा लावायचं आम्ही

      Delete
  2. म्या गराठेनी खेक्डी धरल्यात!पन गळ नै जमल ब्वाॅ!

    ReplyDelete
  3. गव्हाचा पीठ ह्या निवाळ पाण्यात लापरीत्या गढुळी नैय.
    आन् बेडका खुटगळा लाईत्यात.

    ReplyDelete
  4. म्या लय गळाना मासं धरंलत
    खवलाटी ,फिनिस,सिंगट्या,वाळंज, वंबाट
    हे समदं गळानाच बरका.लय नादीक गडी तवा म्या .
    दिसभर तळेव रहेचु बिना भाकरीचा.मासेच्या नादाना भुकंच नय लागायची.

    ReplyDelete
    Replies
    1. बराच मुरेल गडीय दादा तुम्ही तरीच म्हणला तळ्यातल मास खाली का नैय यती

      Delete
    2. शिंग्ट पक गढूळीत

      Delete