सन्माननीय वाचक

Saturday, July 14, 2018

मोडा

आवणीच्या दिसात माॅडा(सुट्टीचा दिवस आपल्या शेतकरी बांधवांसाठी) पाळतात.या दिसी शॅतातला कंचाच काम नय करती.परतीक गावात यगयगळा वार असतो.आमच्या गावातली लाॅका दाॅन मोडं पाळीत्यात.सनवार अन मंगाळवार .मंगाळवार रतनुबाईचा वार अन सनवार मारूतीचा वार.या दोनमंधून मंगाळवार लय कडक धरीत्यात.पर सनवारी जरासी कामा करीत्यात बरका पर औत नय धरती.
पर लाॅका हे दिस वाया नय जाऊन देत.ह्या दिसी सामराद कोलटेंबा इकडं आवाया जातात.फक्त सिव वलांडायची.मंग त्या गावचं मोठं धनी दाळ गुळ साखार अन बोकडाचा वाटा यचेव माणसा आवाया  नेत्यात.
त्या गावाची लाॅका बी तेंच्या मोड्याला या गावात आवाया यत्यात .म्हंजी खदली बदली .
मंग दमाना का होईना समद्या लाॅकांची आवणी पुरी होतं .
माॅडा हा कुळसाईचा वार .
म.सो.लांघी.रतानवाडी




10 comments:

  1. मस्त लिवलाय
    मोडा हा सब्द अन त्येचा वरनान लय भारी जमलाय

    ReplyDelete
  2. छान लिहिलंय

    ReplyDelete
  3. म्वोडा म्हंजे श्यातकामाची सुटी...मंगाळवारी आन् सक्कीरवारी कुळसायांचा म्वोडा धरीत्यात तं ऐतवारी भैरोबाचा,सनवारी मारवतीचा म्वोडा धरीत्यात. परतिक गावात निरनिराळ्या दिशी म्वोडा धरीत्यात म्हनून गाव-शिवभावांची कामा उशेरून घेत्यात. समजा एखांद्याची जमीन दोन गावाच्या हादीत येत आसल तं त्यो गडी ज्या गावचा म्वोडा नसल तिकं तेपल्या शेतात काम करु शकतो. त्याला दोन गावचा ववांडदार म्हंत्यात. म्वौडा संम्दीजना काटकोरीना पाळीत्यात. येखांद्याना आऊत धरला तं त्येच्याकून गावकी दंड वसूल करीत्येय.आपल्याच वाडवडलांनी ह्ये नियम बनावलं पन बघा ना...बैलांना, मानसांना पन श्येतकामात सुट्टी दियाचा किती भारी यिचार त्येंनी क्येला व्हता...

    ReplyDelete
    Replies
    1. वा निस्त्या पोस्टीच नै तं कमेंटय बी मस्त माहीती देणाऱ्या हायात

      Delete
  4. पका भारी लिवलाय.. 💐 💐
    मह्या गावचा मोडा मंगळवारी रयाचा...

    ReplyDelete
  5. पका आवडला आपल्याला

    ReplyDelete
  6. मन्यादा,आवडला बरकां

    ReplyDelete
  7. खदली-बदली 👌👌

    ReplyDelete
  8. थोडक्यात म्वोडा म्हंजे शेतकामाची हप्त्यातली येक दिसाची रजा. जसा शेहरी भागात ऐतवारी हापिसांली रजा रह्येत्येय तशीच रजा श्यातकामातयं रह्येत्येय. फकस्त फरक ह्यो का परतिक गावाची रजा निरनिराळ्या दिशी रह्येत्येय. समजा येखांद्या गावात कुळसाय आसल तं मंग त्या गावचा म्वोडा मंगाळवारी, कुढं मारवतीचा मंदीर आसल तं त्या गावचा म्वोडा सनवारी तं कुढं बैरोबा आसल तं त्या गावचा म्वोडा आयत्वारी...हा कायदा-कानू आपल्याच वाडवडलांनी बनयेल. याचा नेम आसा का ज्या दिशी ज्या गावचा म्वोडा त्या दिशी त्या गावशिवारात औत नाय धरायचा [जमिनीला शेतीचा कंचाच सरजाम लावायचा नाय]. पन समजा दुसऱ्या बाजूच्या गावचा म्वोडा नसल तं त्या गावात जाऊन तिथिल्या ल्वोकांना मदत करू शकतो. आश्याना काय व्हताय का येकमेकांच्या मदतीला ग्येला का संमद्येंची कामा उरकत्यात. येखांद्या धन्येजी जमीन दोन गावच्या शिवारात आसली तं त्येला दोन गावचा 'ववांडदार' म्हंत्यात. मंग त्या धनी ज्या गावात म्वोडा नाय त्या गावशिवारात काम करीतो. गावनियम रह्येतोय का जो म्वोडा पाळनार नाय त्याला चावडी भरवून दंड क्येला जातो. शिकल्या सवारल्या मानसांनवानीच मुक्या जित्राबालाबी हाप्त्यातून येखांदा दी आराम मिळावा म्हनूनश्यान म्वोडा पाळायचा...हा यिचार करनारा माझा समाज किती भारी हाये ना....?

    ReplyDelete
  9. म्वाडा असला का गायख्याला बी सुटी जर गायखा पाॅरसाॅर असंल त कारण दिसी मोठी माणसा गाई शेळ्या चराया नेत्यात.
    मंग त्या दिसी काईमचा गायखा जॅम खुश रहेतोय.

    ReplyDelete