सन्माननीय वाचक

Wednesday, July 25, 2018

पानेची पहाळी...

जेठातला इजांचा कडाका चालूच व्हता,आन वाराय सुटला व्हता. म्हतारीआय चुलीपुढं इस्तू पेटइत व्हती. तसा मागचा दार धाडदिशी वाजला..
आय पळतच दाराक आली न पहेते त काय, आभाळ भरून आला व्हता.  कंच्याय टायमाला पाऊस येणार व्हता, तशी आय वराडली, बारख्या पॉंरा कुडयात पग जरा, तिला राहवलाच नय..
म्हतारी आली तवर मोठी पहाळी आली म्हणून आमी पोहळीला कोंबड्या बसत्यात तिथं बसलो ..
म्हतारीना पदराखाली धरून आमाली चुलीपुड बसवून पितळीत च्या पेया दिला ...
मंग दारामाग उभं राहून पाऊस हेरीत रयलो..
गणपत रामचंद्र कोंढवळे...



3 comments:

  1. हा पहाळी आली का लय दमछाक व्हतेय

    ReplyDelete
  2. कोंबड्या समदेंच्या आंधी लपत्यात पहाळी आल्यावं

    ReplyDelete
  3. हारभरे नई भुजती का मिठ लावुन ...

    ReplyDelete