सन्माननीय वाचक

Sunday, July 15, 2018

उलाटान

मी पार बारीक होतु. त्यासाली ज्याम पाणी जोरात रमला होता. सगळा रानच उप्याळुन ग्याला होता. जीकं हेरील तिकं पाणीच पाणी नद्र पडायचा. बऱ्याच वावरांचा बांध फुटला होता. आमच्या त पार गव्हाळीतुच नदी दोन, तीन दिवस उतारलीच नैय. दुसऱ्या दिवशी नदीचा पूर कमी झालेव खाली नदीकं हेरला त ज्याम झुंज्या मुज्याच पकी लाॅका नदीकं पळत सुटली आसत. म्या आईला ईच्चारला, आयव हा सख्याआजा कुनीकं ग्याला गं? तव्हा आईना सांगातला, नदीला उलाटान आलाय आन् नदीतलं मासं झुरेनी वर येतत. चढान लागलाय. पकं मासं चढतंत त्यांच्या पाॅटातली आंडी सोडाया. गवतातुन मंग जरूशाना मुक्काट गेलु मी नदीकं, तं पक्या मळया लावल्या होत्या झुर्याला, आन् थोड्यच आंतरावं बसुन चार पांच जन म्हणत व्हतं, दोन ओझर भरल बरका मह्या मळईचं.  तीतक्यात त्याना आनली काढुन मळय आन् किरकिंड्यात ओतली. मला तव्हा कळाला का ह्या मळयीमंदी मासं धरीत्यात. मी मुकाट हेरीतच ऊभा रहीलु आन् मह्याक पैैला आन् त्या रोह्यामामाना मना मह्या बंडीत मासं बांधून दिलं.  घरी जा, इक तीक नकु हिंडु चिखला पान्यात. मंग मी ते मासं घेऊन घरी गेलू तं मी हारावलू म्हणून ज्याम गवशीत होती घरची मान्सा. तेव्हढ्यात मह्या बा ना हेरला मला येताना.  आर्रर्र हा तं उलाटानाव गॅलता.!  घरात गेलू न मला नसता गॅला म्हणून काॅलदांड्याची सजा दिली होती. तवापसुन मला उलाटानाचा काॅलदांडा म्हणूनच चिडवाची सगळी भावांडा.
ही मह्यावाली उलाटानाची आठवण...

-म्या आर्जूना बांड्याचा सित्या



6 comments:

  1. पक्कं मासं रेसंल न काय

    ReplyDelete
  2. पकं पाटीच्या पाटी भरून मासं भेटतत चढणीचं. झुरेच्या खाली चालला तं पायाखाली चारपाच तरी येतंतच. पकं लय मासं हायेत ह्या सांगाया लोका म्हणत्यात का पार डोकीला डोकी लागतेय येवढं मासं रहेतत

    ReplyDelete
  3. पका निबार काॅलदांडा घात्लान् काय... !!

    ReplyDelete