सन्माननीय वाचक

Sunday, July 15, 2018

दिवाळीची दीवटी

मह्या हातात ह्या काय हाये, कोन्हाला माहीत हाये का?




2 comments:

  1. याला 'दिवट्या' म्हंत्यात...दिवाळीच्या टायमाला 'कहांडळ' या गवतापासून बनित्यात...कहांडळ गवताची वल्ली काडी कितीबी पिरगाळली तरी ती तुटत नाय. म्हनून गोफावानी ईनून ईनून दिवट्या आन् नागाचा फना बनित्यात. गायख्यांनी जनावरा आडवाला लावली का मंग कहांडळीच्या काड्या तोडून येखांद्या खडकावं बसायचा आन् मंग ईनायचा. दिवटी मंधी योक खोंगळा रह्येतोय...त्येच्यात आर्धा कापेल चिभडु ठिवायचा. त्येच्यातला गर काढून गोडात्याल वतायचा आन् वात घालून पंतीवानी चेटवायचा...बारखाली प्वारा ह्या दिवट्या घेऊन दारोदार 'दिनदीन दिवाळी, गायम्हशी ववाळी' आशी गानी म्हनत दिवाळी उगीत्यात...आन् मंग गुळ-तांदूळ आन् दुधाची मिळून खीर करून खात्यात...

    गवतापासून दिवट्या बनवायचा आवघाड काम रह्याताय. कारन त्येचं फासं बराबर आलं तरच त्या जमाताय...आताच्या प्वारांन्ली नाय जमायचा त्या...

    ReplyDelete
  2. दिन दिन दिवाळी गाई म्हसी ओवाळी
    असा म्हणून दिवाळी ववाळीत्यात तव्हा

    ReplyDelete