मऱ्हाटीची येक लय मधाळ बोली हाये, तिला डांगाणी/मावळी भाशा म्हंत्यात. पण ही भाशा निऱ्ही तोंडी सोरुपातच हाये, ती आजवर कोन्हा लिव्हली नय. ही भीमाशंकर ते त्र्यंबकेश्वर ह्या पट्ट्यात बोलली जातेय. ही भाशा लय ग्वाड हाये. दुसऱ्या मराठीच्या बोलींसारखंच सब्द हायेत पण उच्चार लय येगळं हायेत, त्या उच्चारामुळं भाषा लय ग्वाड वाटतेय. म्हणी तं इतक्या हायात का इचारता सोय नय. गाणी, भारूड, भजना ही सगळी तं ह्या बोलीत कितीतरी हायात, पण ह्या समदा तोंडी हाये. तिचा ह्यो मोठा वारसा कुढंतरी जपून ठिवावा म्हणून हा एक परेत्न
सन्माननीय वाचक
Thursday, July 18, 2024
घन्टा/ बेल 🏫🔔🛎️ह्या घन्ट्याचा अन् मव्हा नाता पक्का लैदीचाय 30 सालाच्याय आदिचाय बरं. कारण ह्याच घन्टा कुढल्याय साळात रह्याताय. अन् ती वाजतेईच. पर म्या आश्रम शाळा पळसुन्ड्याला आस्ताना सग्ळ्या घट्कीला म्हन्जे सूच्ना देत रह्येची. अन् तिच्या सूच्नाना आमी सकाळी झावळ्याच झोपातून उठून, नास्टा, ज्यावाण, पराथना (प्रार्थना), साळा भरल्याव मास्तरान्च्या सग्ळ्या तासान्ली अशी घट्की घट्कीला वाजायची. अन् सार्खा पोरान्चा घन्टा कंदी वाज्णार आवाजाकं ध्यान मातर मखामी रह्याचा. ज्यावाय्ची नास्ट्याची घन्टा वाजली का अभ्यासाला असो नैयत वर्गात. सुसट ताट घेऊन सैपाकघराकं उड्या हानीत जाऊन ज्यावाण आसलतं सैपाक घारात जाऊन तरी काढून गप्चीप पन्गतीला बसायचा.. अन् जर नाश्ता आसलतं लाईनला नंबराने उभा रह्याचा. पर जरका टाईमाना गेलूचत मातर नाश्त्याच्या टोपावं आम्ही दंगाच करायचू. अन् तो दंगा हेरून परत एकदा घन्टा वाज्ली का. अधीक्षक नैय त मुख्याध्यापक मास्तर येणार आहेत. त्या आम्हाली इशारा रह्याचा परत ज्याच्या त्याच्या जागेवं नेमात बसायचो. वयान्डी ही मास्तारा कंदी कंदी पकी आमाली कुटायची भौ.. सग्ळेलीच ह्या घन्ट्याची भल्त्याच आठव्नी हायात. तीच आठव्ण मना आली. ती म्हजे आम्चा (माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन मेळावा) आयोजित क्याल्था तव्वा. म्या चालू कारयकरमातून ध्यानाना ह्या घन्ट्याला भेटाय्या गेलतू दिग्टो हाये तसाच हाये. मह्यातच फरक (बदल) झाल्ला ह्वोता. त्याचा काम त्यो आजतागायत करीत हाये.अन् अश्याच घन्ट्यावं आजय आम्हाली काम कराया लागाताय पर घन्टा अन् घन्ट्याचा आकार निराळ्ळाच हाये. 🔔🛎️एक माजी विद्यार्थी. सिताराम बांडे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment