आज 'संवर्धन आपल्या भाषेचे' या गुरुपाचा वर्धापन दिन...
पयल्या दिसापसून ते आत्तापोहत बरीच जाणकार मंडळी गुरपात आली जेंली पटला ती रायली,बाकीचेंयांबद्ल आपला काय म्हणां नाय.
या गुरुपचा एकच मुद्दा हेवा वाटण्या सारका हाये तो म्हंजे इथं समद्या क्षेत्रात काम करणारी माणसा हायती पर आजपोहत कोहानच्याच कळी-खवंडळी झाल्या नाय.
इशेष म्हंजे बोलीभाष्यातच लय करुन लिव्हला जाताय.त्याचा आनंद वाटतोय.
जेंनी गुरुप सुरु क्याला त्या संगीताताई,मधूमास्तर,ठोकळ सर,तळपाडे सर,मुठ्यादा,
राहुलदा,तुळश्यादा,सुनीताताई,कुसूमताई,सित्यादा,लांघी सर,रढे सर,डामसे भावकी,जालू मास्तर,रामा लॉखांडा,
देशमुख सर,ईदे सर,मधे सर,सविता घोडे,नव्याने दाखल झालेले डॉ.विलास गवारी सर,जगन दादा या समद्यानचेच अभिनंदन...💐
आणि समद्यानाला पक्या घोंगडीच्या तिळशीच्या घुंगरावाणी मंजुळ शुभेच्छा...🙏🌿🌾
पोखत्या माणसांनचा म्हणना ऐकला ना शाळेतल्या न्याणा पेक्सुक् भारी वाटाताय...👍
#भाषा संवर्धन....🙋
No comments:
Post a Comment